Tuesday, June 28, 2011

विश्वास

माझा आहे "विश्वास " तुझ्यावर .......

माझा आहे विश्वास तुझ्यावर ,

पण "अंधविश्वास" नाही ......

तुझी आणि तुझ्या प्रेमाची "आस" आहे

पण तुझ्याशिवाय जगूच शकणार नाही ,

एवढी मी "निराश" नाही ...

तू माझा आहेच तर ,

शंका कशाला घेऊ ?

पण जाशील तर परत फिरून येशील ,

याची खात्री तरी कशी देऊ ?

तू जाताना म्हणाला जर "येतो मी",

तर वाट बघण्याला अर्थ आहे .

तू जातानाच म्हणालास जर "जातो मी",

तर वाट बघनच व्यर्थ आहे .

असं व्यर्थ आयुष्य घालवण्यात ,

मला "रस" नाही ......

प्रेम केलंय तुझ्यावर मनापासून ,

पण स्वाभिमान माझा जागा आहे .

तुझ्यासाठी मी मरू पण शकते ,

पण स्वताला मारून जगण्याला काही सीमा आहे.

खर प्रेम लाचारीत नसतं,

खऱ्या प्रेमाचा अभिमान असतो.

खर प्रेम कारणं देत बसत नाही ,

खर प्रेम मार्ग काढतो.

एवढीच अपेक्षा आहे तुझ्याकडून ,

बाकी मागणी काही "खास" नाही ......

No comments:

Post a Comment